परदेशी विद्यापीठांना भारतात स्वतःचे कॅम्पस सुरू करण्याची अनुमती म्हणजे झोपडपट्टीमध्ये बुलडोझर चालवून मॉल बांधण्यासारखेच…
येथे येण्याची तयारी कोणत्या परदेशी विद्यापीठांची आहे, याचा विचार केला पाहिजे. त्यांना सवलती देण्यासाठी जो पैसा तुम्ही खर्च करणार आहात, तेवढा आपल्या विद्यापीठांवर केला, तर त्यांची गुणवत्ता वाढेल, याची खात्री आहे. शेतकऱ्याच्या हलाखीच्या परिस्थितीचे कारण एका कवीने सांगितले, ‘कष्ट आमचे, माप मात्र तुमचे’. किती अर्थपूर्ण आहे हे वर्णन! तर हे गुणवत्तेचं माप पाश्चात्य देशांनी ठरवलेलं आहे.......